रविवार, ८ नोव्हेंबर, २००९

आपल्या काळात इमारतींची उंची वाढलीपण
माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी॥
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो॥ आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलोपण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
आपली आवक वाढली पण नियत कमी झाली
संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली
हा काळ उंच माणसांचा पण खुज्या व्यक्तीमत्वांचा
उदंड फायद्याचा पण उथळ नात्यांचा
जागतीक शांततेच्या गप्पांचापण घरातल्या युद्धांचा
मोकळा वेळ हाताशी पण त्यातली गंमत गेलेली
विविध खाद्यप्रकार पण त्यातली सत्व गेलेली
दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले
घरं नटली पण घरकुलं दुभंगली
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं
पण कोठीची खोली रिकामीच
हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आज आहे
पण आज आहे तुमचं स्वातंत्र्यही
या पत्राकडे लक्षदेण्याचं किंवा न देण्याचं
यातलं काही वाटलं तर बदला किंवा विसरून जा
कवी : दलाई लामा
अनुवाद : शोभा भागवत

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

आता काहीच नाही मागणं!
याहून काही मागणं नाही,इतकंच त्यानं द्यावं!शब्द दोन प्रेमाचे, सोबत चार पावलांचीकेव्हा केव्हा रुसणं कधीतरी रागावणंइतकं सोडून तुझ्याकडेआता काहीच नाही मागणं !माझ्याही नकळत माझ्यासाठी थांबणं,पुढं पुढं चालताना सारखं वळून पाहणंइतकं सोडून तुझ्याकडेआता काहीच नाही मागणं!

प्रेमात पडलं की

प्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसंवेड्यासारखंच वागतातयात काही चुकीचं नाहीसहाजिकच असतं सारंएकदा प्रेमात पडलं कीउघडू लागतात मनाची दारंमनातल्या भावना अलगद मगकागदावरती उतरतातडोळ्यांमधील आसवंसुद्धाशब्द होऊन पसरतातरात्रंदिवस तिचेच विचारआपल्याला मग छ्ळू लागतातन उमजलेल्या बरयाच गोष्टीतेव्हा मात्र कळू लागतात.डोळ्याशी डोळा लागत नाहीएकाकी रात्री खायला उठतातओठांपाशी थांबलेले शब्दकवितेमधून बाहेर फुटतातगोड गोड स्वप्नं बघत मगरात्र रात्र जागतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसहीप्रेमात निरनिराळे अर्थ असतातगणित, भूगोल, व्याकरण सारीइथल्या व्यवहारात व्यर्थ असतातअंगात फाटकी बनियन असलीतरी इस्त्रीचा शर्ट घालतातजग जिंकल्याच्या तोरयातछाती फुगवून ऎटीत चालतातसभोवताली काय चाललंयकशाचच नसतं भानचालता बोलता तिचाच विचार'तिचं हसणं किती छान?'ठाणे, बोरिवलीच्या पुढेएकदाही आपण गेलेलो नसतोतरी तिच्यासाठी चंद्र-तारेतोडून आणायला तयार असतोतुझ्यावर खरंखुरं प्रेम आहेअसं हजारदा सांगतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.तिने हातास स्पर्श केलातरी खूप आधार वाटतोती समोर नसल्यावर मात्रखोल खोल अंधार दाटतोफार कठोर वाटणारी माणसंहीअशा वेळी फार हळवी होतातखरं सांगतो रात्र रात्रअंधारात एकटीच गातातअशाच वेळी आपल्यामधीलचांगला माणूस बाहेर पडतोहळवा होऊन दुसरयासाठीएकदातरी मनसोक्त रडतोआपल्या इच्छा, आपली स्वप्नेसारीच आपण बाजूला सारतोदुसरयासाठी आनंदाने झुरतोजेव्हा आपण प्रेम करतोचुकून देवळात गेल्यावरहीफक्त एकच गोष्ट मागतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.

प्रेम ..

प्रेम नसावे कापरासारखेझुर्रकन उडून जाणारेप्रेम असावे अत्तरासारखेआयुष्यभर दरवळत राहणारेप्रेम नसावे भुंग्यासारखेएका फुलावरुन दुसर्‍या फुलावर ज़ाणारेप्रेम असावे फुलपाखरासारखेउडूनही फुलावर स्वतःचा रंग ठेवणारेप्रेम नसावे पानासारखे,वार्‍याबरोबर वाहत ज़ाणारेप्रेम असावे वार्‍यासारखे,स्वतःच्या मनानुसार स्वच्छंदी वागणारेप्रेम नसावे माशासारखेतलावाच्या सुकण्याने दुसर्‍या तलावाकडे जाणारेप्रेम असावे कमलाच्या फुलासारखेतलावाच्या सुकण्याने तिथेच कोमेजुन जाणारेप्रेम नसावे ओळखिसारखेकाही क्षणांच्या विरहाने विस्म्रुत होणारेप्रेम असावे आठवणींसारखेह्रूदयाच्या एका कोपर्‍यात निरंतर राहणारे

प्रेम ...

जसं मुक्या माणसाला साखर खायला दिली तर तो साखरेची चव कशी सांगणार? तो फक्त गोड हसेल.प्रेमाचे पण अगदी तसेच आहे. प्रेम ही मनाची भाषा आहे. ती सांगून समजत नाही , ती भाषा उमजावी लागते.

-------------------------------------------------------------------------------------
"प्रेम".... शब्द दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि उच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो.

-------------------------------------------------------------------------------------

मी आज..माज़या बापाला रडतांना पाहिले ....

शांत चेहरा, ना शब्द काही,डोळ्यात प्रेम साठलेले,तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.मी नेहमी त्याला कठोर समजायचो,दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,स्वप्णाना तुटतांना पाहिलय,होय, मी आज...माज़या बापाला रडतांना पाहिलय.आई,मला सायकल हवी,आई म्हणायची बेटा पैसे नाही,दुसर्या दिवशी माज़या हातात चावी असायची.मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारणत्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,मी त्याला शांत हसतांना पाहिलय,होय ,मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.मोठा झालो खर्च वाढला,मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,होय, मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.तो जळत राहिला वात बनून,माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,चुक कळली मला,त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.पण, आज तो या जगात नाही.तरीही....माज़या प्रत्येक संकटात,मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलयहोय, मी आज...माज़या बापाला रडतांना पाहिलय.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

हास्यविनोद ....

मेजर - ''इतना ज्यादा क्यों पीते हो ? तुम्हें खबर है कि अगर तुम्हारा रिकार्ड अच्छा रहा होता तो अब तक तुम सूबेदार हो गये होते।''
जवान - ''माफ कीजिये सर, मगर बात यह है कि जब दो घूंट मेरे अन्दर पहुंच जाते हैं तो मैं अपने आपको कर्नल समझने लगता हूं।''

-----------------------------------------------------------------------------------------------------------

पत्नी - चलो आज बाहर घूमने चलते हैं । और हां, गाड़ी मैं ड्राइव करूंगी ।

पति - अच्छा ! इसका मतलब जाएंगे कार में और आएंगे अखबार में .....

--------------------------------------------------------------------------------------------------------------

एक दिन दो पुराने दोस्त गधे बाजार में मिले। एक गधा बोला - यार तुम तो बहुत कमजोर हो गए हो। क्या तुम्हारा मालिक तुम्हें ठीक से खाने पीने को नहीं देता ?

दूसरे गधे ने ठंडी सांस भरकर कहा - हां दोस्त, खाने पीने को तो ठीक से मिलता ही नहीं है साथ ही काम भी बहुत करवाता है। मेरा मालिक सचमुच बहुत खराब आदमी है।

पहले गधे ने कहा - तो फिर ऐसे मालिक को तुम छोड़ क्यों नहीं देते ? किसी दिन मौका देखकर भाग जाओ न ?

दूसरा गधा - मैं भाग नहीं सकता ।

पहला गधा - पर क्यों ?

दूसरा गधा - मेरे मालिक की एक बहुत ही खूबसूरत बेटी है। जब भी वह उस पर नाराज होता है तो मेरी तरफ इशारा करके उससे कहता है कि ''देखना, एक दिन तेरी शादी मैं इस गधे से कर दूंगा'' ....... अब यार, मैं उस दिन का इंतजार कर रहा हूं ......

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------