शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९
प्रेमात पडलं की
प्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसंवेड्यासारखंच वागतातयात काही चुकीचं नाहीसहाजिकच असतं सारंएकदा प्रेमात पडलं कीउघडू लागतात मनाची दारंमनातल्या भावना अलगद मगकागदावरती उतरतातडोळ्यांमधील आसवंसुद्धाशब्द होऊन पसरतातरात्रंदिवस तिचेच विचारआपल्याला मग छ्ळू लागतातन उमजलेल्या बरयाच गोष्टीतेव्हा मात्र कळू लागतात.डोळ्याशी डोळा लागत नाहीएकाकी रात्री खायला उठतातओठांपाशी थांबलेले शब्दकवितेमधून बाहेर फुटतातगोड गोड स्वप्नं बघत मगरात्र रात्र जागतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसहीप्रेमात निरनिराळे अर्थ असतातगणित, भूगोल, व्याकरण सारीइथल्या व्यवहारात व्यर्थ असतातअंगात फाटकी बनियन असलीतरी इस्त्रीचा शर्ट घालतातजग जिंकल्याच्या तोरयातछाती फुगवून ऎटीत चालतातसभोवताली काय चाललंयकशाचच नसतं भानचालता बोलता तिचाच विचार'तिचं हसणं किती छान?'ठाणे, बोरिवलीच्या पुढेएकदाही आपण गेलेलो नसतोतरी तिच्यासाठी चंद्र-तारेतोडून आणायला तयार असतोतुझ्यावर खरंखुरं प्रेम आहेअसं हजारदा सांगतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.तिने हातास स्पर्श केलातरी खूप आधार वाटतोती समोर नसल्यावर मात्रखोल खोल अंधार दाटतोफार कठोर वाटणारी माणसंहीअशा वेळी फार हळवी होतातखरं सांगतो रात्र रात्रअंधारात एकटीच गातातअशाच वेळी आपल्यामधीलचांगला माणूस बाहेर पडतोहळवा होऊन दुसरयासाठीएकदातरी मनसोक्त रडतोआपल्या इच्छा, आपली स्वप्नेसारीच आपण बाजूला सारतोदुसरयासाठी आनंदाने झुरतोजेव्हा आपण प्रेम करतोचुकून देवळात गेल्यावरहीफक्त एकच गोष्ट मागतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा