छपाईतील दोषांमुळे निर्माण होणारे विनोद ही विनोदाची एक नवीन शाखाच आहे.
द. मा. मिरासदारांचा किस्सा.
हा किस्सा मा. द. मा. मिरासदारांनी काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथील एका भाषणात सांगितला होता.
अनेक वर्षापूर्वी द. मा. एका वृत्तपत्रात नोकरी करत होते. एका बातमीत वाक्य होते की 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी ओवाळले.' छापताना हे वाक्य 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी आवळले.' असे छापले गेले! हे ऐकताच त्या दिवशी सभागृहात हास्याचा स्फोट झाला.
तो जरा विरतो न विरतो तर द. मां. नी आणखी एक स्फोट केला. ते म्हणाले 'अहो, शरद पवार यांचे 'आकारमान' लक्षात घेता आवळायला २५ जणी लागणारच!'
यानंतर उसळलेल्या हास्याने सभागृहाचे छत कोसळायचेच बाकी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा