शुक्रवार, १४ ऑगस्ट, २००९

खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......

प्रत्येकाने प्रेमाला आपापला अर्थ जोडला आहे,
खरं तर खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......

मनाशी सौदा असतो
पण चेहरयावर मुखवटे नाचवतात,
चेहरया मागे कुणी दुसरचं असतं
पण चेहरे खरे भासवतात....

प्रेम म्हणजे खरचं कुणीतरी आपलसं होणं
कुणाच्यातरी मनाच्या सौंदर्यावर् मनापासुन मरणं,
कधी होकाराचा विचार न करता
कुणावर तरी जीवापाड प्रेम करणं....

पण,वर-वरच्या सुंदरतेचे आकर्षण असलेले सगळे
मनाच्या सौंदर्याला इथे विचारत कोण?
क्षणिक सुखाचे भाविक सारे
मनाच्या वाटेवर सांगा घसरतं कोण?

खरचं......
आजकाल नखरेवाल्यांचा भावचं मुळी वाढला आहे,
मनाचा फाटकेपणा लपवण्यासाठी प्रत्येकाने खोटा पडदा चेहरयावर ओढला आहे,
खरं तर खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा